#

Advertisement

Monday, August 18, 2025, August 18, 2025 WIB
Last Updated 2025-08-18T15:25:23Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुख्यमंत्री जाहीर करणार शेतकऱ्यांची कर्जमाफी !

Advertisement

मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची माहिती 

पुसद  : राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी व शेतकरी नेत्यांनी याबाबत वारंवार मागणी केली आहे. अशातच आता शेतकरी कर्जमाफीबाबत मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मोठ विधान केल आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून कर्जमाफी होणार असल्याचे समोर आले आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे एका पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मोठं विधान केलं आहे.
मंत्री संजय राठोड म्हणाले, हा पुरस्कार नसून नव्या पिढीला दिलेला ठेवा आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील. महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा उल्लेख आहे. राज्याच्या प्रमुखांकडून लवकरच याची घोषणा केली जाईल. 

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकरी कर्जमाफीबाबत भाष्य केलं होतं. शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्यवेळी निर्णय घेतील असं भरणे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता आगामी काळात कर्जमाफीचे संकेत मिळाले आहेत. कर्जमाफी झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पीककर्ज काढून पिकांची लागवड केली होती, मात्र दुष्काळामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले होते.