Advertisement
दिल्ली : अमेरिकेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतानं एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारताकडून एक अधिकृत पत्रिपत्रक जारी करण्यात आले आहे, ज्यानुसार आता ब्रिक्स देशांना त्यांचे सर्व व्यापार पूर्णपणे रुपयांध्ये सेटल करण्याची परवानगी मिळाली आहे. भारताच्या या पावलामुळे डॉलरला हादरा बसण्याची शक्यता आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेकडून एक परिपत्रक काढण्यात आलं आहे, ज्यानुसार आता बँकांना पूर्वपरवानगिशिवाय अधिक व्होस्ट्रो खाती उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे या बँका आता देशांच्या आयात-निर्यात व्यवसायांना विशेष व्होस्ट्रो खात्यांद्वारे रुपयांमध्ये व्यापार करण्याची परवानगी देऊ शकतात. भाराताच्या या निर्णयामुळे डॉलरला धक्का बसू शकतो. रुपयांची किंमत वाढेल असं मत अर्थ तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान दुसरीकडे भारताला टॅरिफच्या मुद्द्यावर चीनचं देखील समर्थन मिळताना दिसत आहे. ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर चीनने अमेरिकेला चांगलंच सुनावलं होतं. रशियाचं देखील भारताला समर्थन मिळताना दिसत आहे. रशिया, चीन, आणि भारत यांची वाढत असलेली जवळीक हा अमेरिकेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच आता भारतानं ब्रिक्स राष्ट्रांना रुपयांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी देऊन अमेरिकेला दुसरा मोठा धक्का दिला आहे. याचा मोठा फटका हा अमेरिकन डॉलरला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा दबाव झुगारून भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.