#

Advertisement

Monday, August 25, 2025, August 25, 2025 WIB
Last Updated 2025-08-25T17:36:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

न्यायिक सेवा परीक्षेसाठी मोठी अट : नवीन नियम जाहीर

Advertisement

 'CET 2025' साठी नवीन नियम जाहीर 

मुंबई :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे, यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा स्पर्धा परीक्षेसाठी 'कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) 2025' जाहीर केली आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि नियम : जाहिरात प्रसिद्धी: 29 जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली. अर्ज प्रक्रिया: 1 ऑगस्टपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. नवीन नियम: सर्वोच्च न्यायालयाच्या 20 मे च्या आदेशानुसार, 'न्यायिक सेवा CJ-JD' आणि 'JMFC' परीक्षेसाठी पात्र होण्याकरिता किमान तीन वर्षांचा कायदेशीर सराव अनिवार्य आहे. 

कोणती कागदपत्रं आवश्यक?
उमेदवारांनी अर्ज सादर करताना सनद आणि न्यायालयीन सरावाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.ज्या उमेदवारांनी आधीच अर्ज भरले आहेत, त्यांना अर्जाची प्रत, सनद आणि अनुभव प्रमाणपत्र 25 ऑगस्टपर्यंत bartijmfc@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवणे बंधनकारक आहे.बार्टी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराचा 'CET 2025' साठी विचार केला जाणार नाही.