#

Advertisement

Tuesday, August 26, 2025, August 26, 2025 WIB
Last Updated 2025-08-26T13:03:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गणेश चतुर्थी : गणरायाची प्राणप्रतिष्ठापना कशी करावी !

Advertisement

मुंबई :   भाद्रपदात येती गौरी गणपती, उत्सवा येई बहर, असा बहर सर्वत्र दिसतो. गणेश गणपती घरोघरी बसविले जातात. हे गणपती बाहेरून मूर्ती स्वरुपात विकत न आणता आपल्या शेतातील मातीचा किंवा प्लॉटच्या मातीची मूर्ती तयार करून त्याला गणपतीचा आकार देऊन त्याची स्थापना केली जाते. पण गणपतीची पूजा का करावी, याबद्दल ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण सविस्तर यांनी सांगितलं आहे.

गणेशाची पूजा करावी?
दा. कृ. सोमण सांगतात की, लहान मुलं विचारतात गणपतीला फुलं वाहून आपली सर्व इच्छा पूर्ण होते का? तसं असेल तर फुल विकणारा माणूस फुल विकण्याऐवजी त्याने गणेशाला अर्पण केले असते. अगदी मंदिरातील पूजारी पण स्वत:च बाप्पावर फुलं अपर्ण करुन पूजा करुन सर्व इच्छा पूर्ण करुन घेतल्या असतात. मग आपण गणेशाची पूजा का करावी? तर गणपती खऱ्या अर्थाने गुणपती आहे, सर्व गुणांचा स्वामी आहे. त्यामुळे त्याची पूजा आपल्यामध्ये ते गुण यावे म्हणून त्याची पूजा करावी.  

गणपतीची पूजा भाद्रपद महिन्यात का करतो?
हिंदू धर्मानुसार गणपतीचे आपण तीन वेळा पूजन करत असतो. गणपतीने तीन अवतार घेतले त्यामुळे तीन जयंती आपण साजरी करतो. पहिली वैशाख पौर्णिमेला, गणेश चतुर्थी आणि माघ शुक्ल चतुर्थी अशा तीन वेळा आपण गणरायाची पूजा करतो. भाद्रपद शुक्ल पक्षातील गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात धान्य तयार होत असतात. पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे गणेश पूजन करतात. भाद्रपदातील गणेश पूजन हे पार्थिव गणेश पूजन आहे. पार्थिव म्हणजे मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करणे. 

गणेश चतुर्थी तिथी!
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीस 26 ऑगस्ट दुपारी 1.54 वाजता सुरुवात होत आहे आणि 27 ऑगस्ट दुपारी 3.44 वाजता तिथी समाप्त होतेय. उदया तिथीनुसार गणेश चतुर्थीचा सण 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल.  


गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त  

पंचागानुसार गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी शुभ मुहूर्त 

भाद्रपद चतुर्थी मध्यान्हकाल आणि शुभ मुहूर्त : बुधवारी 27 ऑगस्ट सकाळी 11:25 ते दुपारी 1:54 पर्यंत

राहु काळ : बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता ते दुपारी 1 वाजून 30 मिनिटे.

चंद्रास्त वेळ: बुधवार, 27 ऑगस्ट 2025 रोजी रात्रौ 09 वाजून 27 मिनिटे.

ज्या लोकांना शुभ मुहूर्तावर पूजा शक्य नसेल तर त्यांनी पहाटेपासून मध्यान्हकाल संपेपर्यंत म्हणजे 1:54 पर्यंत गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करु शकतात. 

गणपतीच्या पूजेची 21 फुले

जास्वंद, पांढरे कमळ मधुमालती, जाई, सोनचाफा,केवडा,बकुळ, सुपारी,उंडी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी प्राजक्त, चवई, नांदुरकी,गोविंद, मोहोर, शतपत्र, नानाविध,तांबडे कमळ 

गणपतीच्या पूजेच्या 21 पत्री
दुर्वा, मधुमालती, बोरीचे पान, बेल, माका, धोतरा आघाडा, तुळस,डोलरी,कण्हेर,शमी,अर्जुनसादडा,रुई, जाई, विष्णुक्रांता,डाळिंब,देवदार, केवडा,मोरवा,पिंपळ,अगस्ती