Advertisement
खासदार सुप्रिया सुळेंचा थेट सवाल
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी थेट सवाल केला आहे,'माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं, तर मग तुम्हाला काय प्रॉब्लेम?' पुढे त्या म्हणाल्या की, आम्ही आमच्या पैशाचे मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही. यावेळी सुप्रिया सुळेंनी थेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या टीका केली आहे. पत्ते तुम्ही खेळायचे आणि कोर्टात फेऱ्या आम्ही मारायच्या का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
नाशिकच्या दिंडोरीच्या खेडगावमध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमात सुप्रिया सुळे थेट बोलत होत्या. या कार्यक्रमात दिलेल्या भाषणातून मंत्री नरहरी झिरवळ यांच्यां समोरच सुप्रिया सुळे यांची सरकारवर सडकून टीका केली. 50 वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, हे खरं पुरोगामित्व असल्याचे सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही, त्यामुळे मी मागणच बंद केलं आहे. दहा वेळा आपण वेळ मागतो पण वेळ देत नाहीत याचा अर्थ काय, म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो असेही सुळे म्हणाल्या. यावेळी सुळे यांनी अमित शाह यांचे जाहीर आभार देखील मानले. जुळवून दोन्ही बाजूने घ्यावं लागत, एका बाजूने नाही असे म्हणत सुळे यांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना टोला लगावला.