#

Advertisement

Monday, August 25, 2025, August 25, 2025 WIB
Last Updated 2025-08-25T12:53:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

नितेश राणेंची मनोज जरांगेंना जाहीर धमकी

Advertisement

मुंबई : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईतील मोर्चावर ठाम असल्याचं जाहीर केलेलं असताना,  नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना जीभ हातात काढून देऊ अशी धमकी दिली आहे. एक्सवर त्यांनी व्हिडीओ शेअर करत मनोज जरांगेंना खडेबोल सुनावले आहेत.
जे रक्ताने मराठे असतात ते कोणाच्या आईबाबत अपशब्द वापरणार नाहीत. ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो, त्या छत्रपती शिवरायांनी नेहमी प्रत्येक माता-बहिणीचा आदर केला आहे. जरांगे यांनी आरक्षणाची लढाई लढावी, पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करत असल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याचं सामर्थ्य 96 कुळी मराठ्यात आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं नितेश राणे म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत काय विधाने केली आहेत?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर खालील प्रमुख आरोप केले:  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप. 
मराठा आणि ओबीसी समाजात दंगल भडकवण्याचा कट रचत असल्याचा दावा. 
मराठा समाजाच्या तरुणांचे भवितव्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. 
व्यक्तिगत द्वेषातून फडणवीस यांनी मराठ्यांना डिवचण्यासाठी १७ जाती ओबीसीत समाविष्ट केल्याचा दावा. 
जरांगे यांनी फडणवीसांना थेट इशारा दिला की, “तुम्ही माझ्या नादी लागू नका, मी मुंबईला येणारच” आणि “फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही.”