#

Advertisement

Tuesday, August 12, 2025, August 12, 2025 WIB
Last Updated 2025-08-12T17:22:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिली मोठी जबाबदारी

Advertisement

फहाद अहमद कोण आहे ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने नुकतीच  नव्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काही प्रमुख आणि चर्चेत असलेल्या नावांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या यादीमध्ये 15 नावांची घोषणा करण्यात आली आहे. 
या यादीमधील अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. या यादीतील फहाद अहमद या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. फहाद अहमद याने विधानसभा निवडणूक 2024 लढवली होती. फहाद अहमद याने अणुशक्तिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, फहाद खान याच्या निवडीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. फहाद अहमद हा अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती आहे. 16 फेब्रुवारी 2023 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. अत्यंत साध्या पद्धतीने दोघांचा लग्नसमारंभ पार पडला. 2024 मध्ये फहादने अणुशक्तिनगर येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याच्या विरोधात अणूशक्तिनगर येथून नवाब मलिक यांची कन्या सना खान हिने निवडणूक लढवली आणि जिंकलीही होती. 


ही आहे यादी...

  1. विद्याताई चव्हाण
  2. अंकुश काकडे
  3. सुधाकर भालेराव
  4. भीमराव हत्तीअंबिरे
  5. महेश तपासे
  6. विकास लावंडे
  7. सक्षणा सलगर
  8. मेहबुब शेख
  9. फहाद अहमद
  10. राजा राजपुरकर
  11. मनाली भिलारे
  12. नितीन देशमुख
  13. क्लाइड क्रास्टो
  14. राखी जाधव
  15. रचना वैद्य