Advertisement
पीएच.डी. पदवी प्रदान करणारे प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचा सन्मान
मंगळवेढा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शाहू शिक्षण संस्था पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांना पीएच. डी. मिळाल्याबद्दल महात्मा गांधी विद्यालय, वाघोली येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. शब्दप्रभू म्हणून ओळख असलेले प्रा, लक्ष्मणराव आता "डॉक्टर" म्हणूनही ओळखले जाणार असल्याने मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयाचे मुख्याध्यापक चिदानंद माळी यांनी प्रा. ढोबळे सरांनी शाहू शिक्षण संस्थेची स्थापना करून लहानशा रोपट्याचे वटवृक्षामध्ये कसे रूपांतर झाले, याविषयी माहिती दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि कादंबरी लेखन हा प्रा, लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पीएच.डी.चा विषय होता. त्यामध्ये यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करून त्यामध्ये समाजाच्या वेदना माणसाला झालेल्या कष्टाचा त्यांनी या प्रबंधामध्ये त्यांनी परामर्श घेतला आहे. यावेळी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा संपूर्ण आढावा विषद केला. सम्नानबाबत त्यांनी आयोजकांचे आभारही व्यक्त केले.
विद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन उघडे-पाटील यांना वकिली पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनल पाटील, मुख्याध्यापक चिदानंद माळी, अधीक्षक कुलदीप म्हमाणे, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सोनाली उघडे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल माहिती सांगितली. यावेळी नितीन उघडे-पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन कल्लाप्पा शेजाळ केले. पांडुरंग घोडके यांनी आभार मानले.