Advertisement
नियम पाळला नाही तर वर्ष वाया जाणार
मुंबई : दहावी- बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेबद्दल दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पहिला निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा तर दुसरी निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकतं. दहावी - बारावी बोर्डाच्या परीक्षेत पहिला दिवशी हिंदी किंवा मराठीचा पेपर घेण्यात येतो. पण आता या नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आाल आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदी भाषेच्या पेपरच्या ऐवजी सोप्पा विषयाचा पेपर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.असंख्य विद्यार्थ्यांना हिंदी पेपरमुळे मानसिक दबाव येतो, हे समोर आला आहे. त्यामुळे परीक्षेची सुरुवात विद्यार्थ्यांची चिंतेत आणि मानसिक दबावाने होते. त्यामुळे बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. पण बोर्डाकडून पहिला सोप्पा पेपर कुठला असेल याबद्दल अद्याप काही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी हा नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे, नाहीतर त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितलं की, विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत हजेरी लावून किमान 75 टक्के उपस्थिती राखणे अनिवार्य असणार आहे. तुमची शाळेतील हजेरी ही 75 टक्के खाली असेल तर तुम्ही परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही, असं ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे. या सूचनांनुसार दहावी आणि बारावी हे दोन वर्षांचे शैक्षणिक कार्यक्रम जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजे, दहावीची परीक्षा द्यायची असल्यास विद्यार्थ्याने नववी आणि दहावी असे दोन्ही वर्ग शिकलेले असणे बंधनकारक राहणार आहे. त्याचप्रमाणे, बारावीची परीक्षा देण्यासाठी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांचा अभ्यास पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे. केवळ अंतिम वर्षी शिकून परीक्षा देता येणार नाही, असा इशारा मंडळाने विद्यार्थ्यांना दिला आहे.
