Advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांची माहिती
नाशिक : येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्यस्तरीय शिबिरात पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी, महिला, युवक आणि शेतकरी या मुद्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशासमोर मांडलेला व्होट चोरीचा मुद्दा तसेच आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीविषयी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिली.
नाशिक हा शेतकर्यांचा जिल्हा आहे, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा येथे नेहमीच राजकीय प्रभावही राहिला आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी पक्षाचे राज्यस्तरीय शिबिर नाशिकमध्ये घेतले. शरद पवार यांच्या नेतृत्वात पुलोद जिल्ह्यातील सर्व 14 आमदार विजयी झाले होते. त्यानंतर असे यश अन्य कोणालाही मिळाले नाही. तेव्हापासून शरद पवार आणि नाशिक हे एक वेगळे राजकीय समीकरण झाले असल्याचेही लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या बैठकीस शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, एकनाथ खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, उत्तम जानकर यांच्यासह सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरही घेण्यात आले.

