#

Advertisement

Tuesday, September 2, 2025, September 02, 2025 WIB
Last Updated 2025-09-02T12:53:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मराठा आंदोलनाला यश, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं

Advertisement

मुंबई :  मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आले आहे. जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जीआर स्वीकारला आहे. यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत. त्या आरक्षण उपसमितीने स्वीकारल्या आहेत. त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली. यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण लढाईला अखेर यश मिळालं आहे. राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या आहेत. उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत मसुदा वाचून दाखवला. यानंतर मनोज जरांगे यांनी आपण जिंकलो असं जाहीर करत पुढील एका तासात जीआर काढावा, त्यानंतरच आंदोलन थांबवू असं जाहीर केलं. तसंच आज रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करु असंही सांगितलं आहे.
विखे पाटलांनी यावेळी, आम्ही मागण्या मान्य करतोय असं सांगितलं. त्यावर आता समाजाचा अपमान होऊ देऊ नका, हे जीआर काढा आणि तो टिकवा असं जरांगे म्हणाले. विखेंनी सांगितलं की,, समितीने ठरवले आहे याबाबत माहिती घेऊन दाखले निकाली काढण्यास सांगतोय, जिल्ह्याला प्रत्येक सोमवारी याबाबत बैठक होईल. यापूर्वी जात पडताळणी समितीकडे मनुष्यबळ नव्हते आता मनुष्यबळ दिले आहेत त्याला गती येईल.

कोणत्या मागण्या मान्य झाल्या....

1) हैद्राबाद गॅजेट अंमलबजावणी विषय --- हैद्राबाद गॅजेट अंमलबजावणी साठी मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देऊ, कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात करू.
2) सातारा संस्थान गॅझेट --- पश्चिम महाराष्ट्र पूर्ण येतो..सातारा संस्थान गॅजेट अंमलबजावणी बाबत कायदेशीर बाबी तपासून जलद गतीने निर्णय घेता येईल... 15 दिवसात तपासू अंमलबजावणी देऊ...( काही त्रुटी आहेत त्यामुळं थोडं वेळ लागतो )
3) महाराष्ट्रातील केसेस बाबत --- त्यांनी गुन्हे मागे घेतले जे राहिले ते कोर्टात जाऊन मागे घेऊ. सप्टेंबर अखेर पर्यंत मागे घेऊ असा जीआर काढला.
4) मराठा आरक्षण आंदोलन बलिदान दिलेल्या लोकांना मदत आणि शासकीय नोकरी द्यावी -- आंदोलक वारसांना आतापर्यंत 15 कोटी मदत केली आहे. उर्वरित कुटुंबयाना 1 आठवड्यात मदत मिळेल. नोकरीसाठी राज्य परिवहन मध्ये नोकरी मिळेल.. यात थोडं बदल करावा अशी आमची मागणी आहे. शिक्षणानुसार  नोकरी द्या अशी आमची मागणी आहे. एमआयडीसी मध्ये मिळाले तर खूप उत्तम आहे.
5) 58 लाख नोंदी सापडल्या त्याचा रेकॉर्ड ग्रामपंचायत ला लावा,  व्हॅलीडीटी अडकल्या आहेत