Advertisement
विजेत्या खेळाडूंचे डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले कौतुक
मंगळवेढा : शाहू शिक्षण संस्था संचलित शाळांनी जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक १७ वर्ष मुलीच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धा इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे झाल्या. इंग्लिश स्कूल संघाला पराभूत करून माध्यमिक आश्रम शाळा व जुनिअर कॉलेज येड्राव शाळेचे नाव या खेळाडूंनी उज्वल केले. १४ वर्षे वयोगटातील संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांनी विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला. यावेळी प्रशालेचे प्राचार्य आर. पी. दत्तू, क्रीडा शिक्षक यादव, श्री. हेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
