Advertisement
पुणे : 'कबुतर डाळ' आणि 'कबुतर मटर' हे दोन्ही पदार्थ सुपरफूड म्हणून ओळखले जातात. शरीराला पौष्टिक पदार्थांची आवश्यकता असते यामध्ये हे दोन्ही पदार्थ येतात. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही पदार्थ आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरात असतात. ही डाळ म्हणजे तूरडाळ.
सोशल मीडियावर 'कबुतर डाळ' चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे? भाषांतराच्या चुकीमुळे हा गोंधळ झाला आहे. Pigeon Pea हा शब्द गुगल ट्रान्सलेटरवर टाकला तर त्याचा अर्थ 'कबुतर डाळ' किंवा 'कबुतर मटर' असा येतो. यामुळे लोकांना वाटू लागली की, ही कोणती नवी डाळ आहे. तर ही आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारी तूरडाळ आहे. तूरडाळ आहारातील अविभाज्य घटक आहे. हजारो वर्षांपासून ही डाळ प्रत्येक भारतीय घरात वरण, आमटी, सांबारच्या स्वरुपात बनवली जाते. तूर डाळीमध्ये प्रथिनांचे आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. तसेच या डाळीमध्ये मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, जस्त आणि फोलेट देखील असतात. यात विरघळणारे आणि न विरघळणारे दोन्ही फायबर आहेत.
याव्यतिरिक्त, डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे वजन कमी करणे आणि डायबिटिस कंट्रोलमध्ये आणण्यासाठी याचा फायदा होतो. या डाळीमध्ये जटिल कर्बोदकांमधे असतात. तूरडाळीमुळे व्हिटॅमिन सी अधिक असून रोग प्रतिकारशक्ती वाढते. तूरडाळीमुळे शरीरात अँटीऑक्सिडेंट्ससारखे कार्य करतात. हे आपले रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. यामुळे हृदय देखील निरोगी राहते. परंतु केवळ Pigeon Pea हा शब्द गुगल ट्रान्सलेटरवर टाकला तर वेगळा अर्थ निघू लागल्याने सध्या डाळीची ही नवे चर्चेत आली आहेत.
