Advertisement
पुणे :जागतिक अस्थिरतेमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच सोन्या-चांदीच्या किमती नव्या उच्चाकांवर पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 44 टक्के वाढ झाली आहे. मागील 6 महिन्यांमध्ये सोने 26 टक्के आणि चांदीच्या दरात 29 टक्के इतकी प्रचंड वाढ झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातून वाढलेली मागणी, कमकुवत झालेला डॉलर, ट्रम्प टॅरिफमुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता यामुळे सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या सहा महिन्यांत चांदीच्या किमती 1 लाख 35 हजारांवर तर वर्षभरात भारतात चांदीचा दर प्रति किलो दीड लाखांवर जाण्याची शक्यता "मोतीलाल ओसवालच्या अहवाला"त व्यक्त करण्यात आली आहे. चांदीच्या किमतीत सोन्यापेक्षा जास्त वाढ होण्याचे कारण म्हणजे तिची गुंतवणूक आणि औद्योगिक मागणी. सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने आणि 5G तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत चांदीचा वापर वाढला आहे, ज्यामुळे तिची मागणी आणि किंमत वाढत आहे.
