Advertisement
मातंग समाज अपशब्द सहन करणार नाही : बहुजन रयत परिषदेचा इशारा
सोलापूर : अनुसुचीत जातीच्या आरक्षण वर्गीकरणा संदर्भात अ ब क ड या मुद्द्यावर बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे गेली काही वर्षे न्यायालयीन लढाई लढत आहे. अ ब क ड अशा वर्गीकरणातून मातंग समाजाला योग्य प्रमाणात आरक्षण मिळू शकते, याबाबत त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. याच विषयासंदर्भात त्यांनी आपले मत एका दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, समोरील व्यक्तीने जातीच्या उपवर्गकरणा संदर्भात बोलण्याऐवजी त्यांनी ढोबळे यांच्यावर वैयक्तीक टीका केली. लक्ष्मणराव ढोबळे हे अनुसुचीत जातीच्या अ ब क ड वर्गीकरणाबाबत कायदेशीर बाबी समजावून सांगत असताना त्यांच्या भाषेचा विपर्यास करून समोरील व्यक्ती समाज बांधवात तेढ निर्माण करण्याचा प्रयन करीत होती. यातून मुलाखतीचा विषय भरकटवीण्याचा प्रयत्न केला गेला, आरक्षणाच्या अशा गंभीर विषयावर जर कोणी चुकीचा समज पसरविण्याचे काम करीत असेल तसेच लक्ष्मणराव ढोबळे यांच्या विषयी कोणी अपशब्द बोलत असेल तर मातंग समाज बांधव सहन करणार नाही, असा इशारा बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर यांनी दिला आहे.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने अनुसुचीत जातींचे वर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शासनाची बाजू मांडली आहे. या अनुषंगाने डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे मातंग सामाजासह इतर समाज बांधवाना मिळणाऱ्या आरक्षणाची माहिती मुलाखतीत मांडत होते. अनुसुचीत जातीत समावेश होणाऱ्या ५९ जातीच्या अ ब क ड अशा वर्गीकरणाबाबत ढोबळे हे न्यायालयीन लढाई लढत आहेत. याबाबतचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. मातंग समाजासह ज्या-त्या समाजाला त्यांच्या वाटेचे हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी ते कायदेशीर बाजू मांडत आहेत. दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत त्यांनी तोच प्रयत्न केला. परंतु, ज्यांचा याविषयी अभ्यासच नाही, अशी समोरील व्यक्ती केवळ ढोबळे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात धन्यता मानत होती, हे योग्य नाही. ढोबळे हे समाजाचे ज्येष्ठ नेते, ते समाजहिताचेच काम करीत आहेत. गेली अनेक वर्ष ते आरक्षणावर कायदेशीर काम करीत आहेत. यामुळे त्यांच्या विषयी समाज बांधव खालच्या पातळीवरील भाषा सहन करणार नाही, असे ईश्वर क्षिरसागर यांनी स्पष्ट केले.
ढोबळे यांनी काय केले ?
प्रा. ढोबळे यांनी काय केले, असा प्रश्न मुलाखतीत समोरील व्यक्तीने केला. मुळात त्या व्यक्तीला ढोबळे यांचे कार्यच माहित नाही. केवळ ते आमदार झाले, मंत्रिपद, सत्ता उपभोगली असेच ते म्हणत होते. प्रा. ढोबळे यांचे शौक्षणिक कार्य मोठे आहे. आज, महाराष्ट्रात त्यांनी सुरु केलेल्या शाळांमध्ये कित्येक बहुजनांची मुले, मुली अल्पशुल्कात शिक्षण घेत आहेत. समाजातील हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली आहे. परंतु, त्यांनी कधीही आपल्या कामाचा गाजावाजा केला नाही.
न्यायालयीन लढाई लढताना !
प्रा. लक्ष्मणराव ढोबळे हे समाजासाठी, योग्य पध्दतीने आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयीन लढाई लढत आहेत. अशावेळी त्यांनी कोणत्याही समाज बांधवाकडून रुपयाही घेतला नाही किंबहुना याबाबत समाजजागृती करण्याकरिता राज्यभर मेळावे घेणे, आंदोलने करणे अशी कामे केली आहेत, शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, या गोष्टींचे त्यांनी कधी सेल्फ मार्केटींग केले नाही.

