#

Advertisement

Tuesday, September 9, 2025, September 09, 2025 WIB
Last Updated 2025-09-09T14:31:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"गोकुळ"च्या सभेत गोंधळाची परंपरा कायम

Advertisement

मुश्रीफ विरुद्ध महाडिक नवा संघर्ष उफाळला 

कोल्हापूर: गोकुळची सभा म्हणजे राडा हे समिकरण कायमच राहीलं. मात्र यंदाच्या सभेतला संघर्ष वेगळा पाहायला मिळाला. मुश्रीफ विरुद्ध महाडिक असा गोंधळ या सभेत होता. गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक 2026 ला पार पडणार आहे. त्यापूर्वीची ही सर्वसाधारण सभा होती. गोकुळ दूध संघामध्ये सध्या शाहू आघाडीची सत्ता आहे. तर राजर्षी शाहू हे विरोधी पॅनल आहे. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांचे सत्ताधारी पॅनलमध्ये तर महाडिक गट हे विरोधी पॅनलमध्ये आहेत. त्यामुळे दरवर्षी महाडिक विरुद्ध पाटील  असा संघर्ष पाहायला मिळत असतो. मात्र यंदाच्या सभेत मुश्रीफ विरुद्ध महाडिक असा गोंधळ रंगला. 

गोकुळची 2026 च्या निवडणुकीपूर्वीची अंतिम सर्वसाधारण सभा सुरू झाली. संचालक शौमिका महाडिक या सभासदांमध्ये बसलेल्या होत्या. तर सत्ताधारी पॅनलचे नेते मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील हे देखील सभासदांमध्ये उपस्थित होते. गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ आणि इतर संचालक व्यासपीठावर बसले होते. गोकुळची सर्वसाधारण सभा सुरू झाली की सभासद आत येण्याच्या वेळेसच गदारोळ सुरू होतो. काही बोगस सभासद सभेमध्ये बसवले जात असायचे. त्यामुळे तसेच सभासदांना आत सोडले जात असत. यंदा मात्र सभासदांचा प्रवेश शांततेत झाला. सभा सुरू होण्यापूर्वी सर्व सभासद आत मध्ये बसलेले होते. 
 गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ हे अहवालाचे वाचन करत असताना सभासदांनी शांततेत ऐकून घेतलं. पण ज्यावेळेस प्रश्नोत्तराचा काळ सुरू झाला त्यावेळी मात्र गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली. संचालिका शौमिका महाडिक या ज्यावेळेस बोलण्यासाठी उभा राहिल्या त्यावेळेस हा गोंधळ आणखीन वाढला. दोन्ही बाजू कडून जोरजोरात घोषणाबाजी सुरू झाल्या. दरवर्षी महाडिक विरुद्ध पाटील अशा घोषणाबाजी असायच्या मात्र यंदाच्या सभेत महाडिक विरुद्ध मुश्रीफ अशा घोषणाबाजी होत्या. यंदाच्या सर्वसाधारण सभेत अहवालामध्ये गोकुळच्या दूध संकलन, संचालक वाढ, आर्थिक वर्षातील नफा आणि इतरही काही मुद्दे होते.