#

Advertisement

Wednesday, September 17, 2025, September 17, 2025 WIB
Last Updated 2025-09-17T12:14:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अधिकाऱ्यांसमोरच थेट विहिरीत उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या

Advertisement

पैठण : शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याने महसूल अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पैठण तालुक्यातील खादगाव येथे ही हदयद्रावक घटना घडली आहे. मयत शेतकऱ्याचं नाव संजय शेषेराव कोहकडे असे असल्याची माहिती समोर आली आहे. शेताच्या दोन्ही बाजूंने पाटाचे खोदकाम झाल्याने 45 वर्षीय संजय कोहकडे यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नव्हता. तसेच यामुळेच त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागले. त्यांनी याबाबत अनेकदा महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मंगळवारी अधिकारी पंचनामा करत असताना संजय कोहकडे यांनी आपली व्यथा सांगितली. 
आधीच नुकसान आणि अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असलेल्या या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांनी संजय कोहकडेंनाच झापल्याने ते संतापले. त्यांनी या अधिकाऱ्यांसमोरच थेट विहिरीकडे धाव घेत अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी घेतली. काहींनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मदत पोहोचेपर्यंत पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून शेतकऱ्यांबद्दल अधिकाऱ्यांनी थोडी संवेदनशीलता दाखवली असती तर आज शेतकऱ्याचा जीव वाचला असता असं स्थानिकांचं म्हणणं आहे. आता या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी कारवाई होणार का याबद्दलची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.