#

Advertisement

Wednesday, September 17, 2025, September 17, 2025 WIB
Last Updated 2025-09-17T18:14:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पाकिस्तान झालं "पिठाला" महाग

Advertisement

20 किलो गव्हाचे पीठ तब्बल 2400 ते 2500 रुपयांना

मुंबई : पाकिस्तानमध्ये दरवर्षी सप्टेंबर महिन्यानंतर गहू आणि पिठाचे भाव वाढतात. त्यामुळे यावेळीहीदेखील पाकिस्तानी जनतेला महागाईने चांगलेच पछाडले आहे.
सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये गव्हाचा भाव वाढतो. याच काळात पिठदेखील महाग होते. सध्या ही महागाई तिथे दिसू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या खैबर पख्तनख्वाह या भागात अगोदर 20 किलो गव्हाचे पीठ 900 ते 1000 रुपयांना (पाकिस्तानी रुपये) मिळायचे. आता हेच 20 किलो गव्हाचे पीठ तब्बल 2400 ते 2500 रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. गव्हाच्या पिठाची किंमत वाढल्यामुळे आता तिथे ब्रेडच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी जनतेला पिठासाठी तसेच गव्हाच्या पिठापासून तयार होणार्‍या इतर खाद्यपदार्थांसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
पाकिस्तानमध्ये गव्हासोबतच तांदळाचाही भाव चांगलाच वाढला आहे. ही भाववाढ प्रतिकिलोमागे 30 ते 40 रुपये आहे. अगोदर 25 किलो तांदळाची एक बॅग आठ हजार रुपयांना मिळायची. आता हीच बॅग नऊ ते साडे नऊ हजार रुपयांना मिळत आहे. पाकिस्तानातील काही भागात नुकताच मुसळधार पाऊस आला. काही ठिकाणी तर महापुरासारखी स्थिती निर्माण झाली. यामुळे बाजारातील पुरवठ्यावर परिणाम पडला. त्यामुळेदेखील ही माहागाई दिसून येत आहे.