Advertisement
वेळापत्रकाचा प्रश्न सोडवावा : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची मागणी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) २०२५-२६ या वर्षासाठी ( सीईटी) सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा १४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत होत आहे. युपीएससीची सीडीसी व बार्टीची परीक्षा एकाच दिवशी असल्यानेही गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे बार्टीने परीक्षा केंद्रांचे वाटप पारदर्शकपणे आणि वेळेत करावे, केंद्र बदलण्याची परवानगी द्यावी. एकाच दिवशी आलेल्या परीक्षांबाबतच्या वेळापत्रकाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली आहे.
बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आर्टी या संस्थामधून स्पर्धा परीक्षा पूर्व-प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नामवंत खासगी संस्थामधून प्रशिक्षण देण्यासंदर्भातील योजनेच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी बार्टीकडून प्रवेश परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळते. परीक्षांच्या शहरांचे वाटप परीक्षा होण्याच्या सहा दिवस आधी जाहीर केले जात आहे. परीक्षा केंद्राची माहिती परीक्षेच्या तीन दिवस आधी जाहीर केले जाणार आहे, असे बार्टीच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्र बदलले जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. विद्यार्थ्यांना दूर असलेली परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत, त्यातच १४ सप्टेंबर या दिवशीच यूपीएससीची सीडीएस परीक्षा आहे त्याच दिवशी बार्टीची परीक्षा होत आहे. यामुळे दोन्ही परीक्षा एकाच एकाच दिवशी असल्याने विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देता येणार आहे.
