Advertisement
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडून मागण्या तत्वत: मान्य
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना समाजबांधवांपर्यंत योग्यरित्या पोहचत नसल्याने याबाबतचे निवेदन बहुजन रयत परिषदेच्या समितीने मुंबई येथील मुख्य कार्यालयात प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आले होते. याची तातडीने दखल घेत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे यांनी काही मागण्या तत्वत: मान्य झाल्याचे सांगितले.
बहुजन रयत परिषदेच्या मागण्यांना प्रतिसाद देत अण्णा भाऊ साठे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगोळे यांनी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मातंग समाजातील तरुणांना 2 ते 5 लाखांच्या कर्जासाठी केवळ एकच जामीनदार घ्यावा, नोंदणीकृत बँड दुकानदार व कलाकारांची जिल्हानिहाय यादी तयार करावी, थांबवलेली ऑनलाईन वेबसाईट त्वरित सुरू करावी तसेच उद्योजक प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज, जिल्ह्यात स्थायी व्यवस्थापक नेमणे अशा मागण्या तत्वत: मंजूर करण्यात आल्या आहेत. यावेळी बैठकीत प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष ईश्वर क्षिरसागर, विदर्भ जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे, महिला आघाडी अध्यक्ष हिराताई खडसे आदींसह बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
