Advertisement
माढा : माढा तालुक्यातील कुर्डू येथील मुरूम उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोन जोडून देणारे बाबाराजे जगताप यांचा अमली पदार्थ पितानाचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी वायरल झाला होता. यानंतर आता त्यांचे सहकारी नितीन जगताप यांनी गावच्या मुख्य चौकामध्ये उभे राहून हा व्हिडिओ ज्या कोणी व्हायरल केलेला आहे. त्याला शोधून त्याचा कार्यक्रम करणार असा धमकी वजा इशारा दिलेला आहे. त्यामुळे कुर्डू गावामध्ये आता दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष आहे.
नवा व्हिडिओ समोर आल्याने तसेच नितीन जगताप आपण मोहिते पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचा उल्लेख करत आहे. पण मोहिते पाटील यांनी गावाचे नाव बीड सोबत च्या गुन्हेगारी प्रमाणे जोडल्याने त्यांचे काम या पुढे करणार नसल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. महिला अधिका-याच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फडणवीसांच्या खंबीर भूमिकेमुळे अजित पवारांचं एक पाऊल मागे घेतल्याचे समजते.
