#

Advertisement

Friday, September 19, 2025, September 19, 2025 WIB
Last Updated 2025-09-19T12:13:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पडळकरांकडून अर्वाच्च टीका ; शरद पवार यांचा थेट फडणवीस यांना फोन

Advertisement

मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना सूचना

मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यासंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं असून, यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शरद पवारांनी याची दखल घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन नाराजी व्यक्त केली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांना  फडणवीस यांनी फोन केला. फोनवर पडळकरांना सल्ला दिला. यापुढे अशा टीका न करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना सूचना करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा यापुढे पालन करणार आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. "जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?" अशा अर्वाच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली. अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे ती कार्यक्रम करायची. तुझ्यासारख्याची औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही,' असं वादग्रस्त विधान पडखळकरांनी आपल्या भाषणादरम्यान केलं. 

गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही. यासंदर्भात गोपीचंद पडखळकरांशीही मी बोललेलो आहे. त्यांनाही मी सांगितलं आहे. मला शरद पवारांचा फोन आला होता. ते ही माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशाप्रकारच्या स्टेटमेंट आम्ही कधीच समर्थन करणार नाही, असं स्पष्ट केलं.