Advertisement
भैरवनाथ शुगर लिमिटेड कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ
लवंगी :पाच वर्षे कसा वागला तरी चालेल पण निवडणुकी दरम्यान शेवटच्या तीन दिवसात चांगला वागतो हे दाखवून जनतेचा फसवण्याचा प्रयत्न होतो, अशी व्यक्ती एसटीत शेजारी बसलेल्या बाईसारखी असते त्यामुळे माणूस बदलताना आणि पुढचा उमेदवार निवडताना अनिल सावंत सारखा उमेदवार शोधूनही सापडणार नसल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी व्यक्त केले.
भैरवनाथ शुगर लिमिटेड युनिट-3 लवंगी कारखान्याच्या 12 व्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते, अध्यक्षस्थानी हभप बाळासाहेब महाराज होते. यावेळी व्यासपीठावर भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत, उपाध्यक्ष केशव सावंत, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, संतोष रंधवे, सुधीर भोसले, सिताराम भगरे आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, माढा तालुक्यातील वाकाव सारख्या ग्रामीण भागात सायकलवर फिरून राज्याचा मंत्री होण्याचे स्वप्न बाळगून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणारे तानाजी सावंत आणि वाकाव ते लवंगी हे 200 किलोमीटर पार करून मंगळवेढा दक्षिण भागातील माळरानावर साखर कारखाना काढून अध्यक्ष अनिल सावंत यांनी या भागातील ऊसाला व बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.पाच आमदाराचा बळ असलेला साखर कारखाना एका रात्रीत काय करू शकतो,याची जाणीव ठेवून खासगी क्षेत्रात सर्वात मोठी गाळप क्षमता असलेले कारखानदारी या भागात उभा करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करताना एक तप पूर्ण अध्यक्ष अनिल सावंत यांनी प्रामाणिकपणे केले एखाद्या शिष्टमंडळाची हसून बोलले तरी साहेब बोलले म्हणून दक्षिण भागातील शेतकरी सहा महिने जिवंत राहू शकतो, असा प्रामाणिक शेतकरी या भागात असून ज्या बोटाला शेण काढायची सवय आहे त्याच बोटाला धार काढायचा हक्क आहे त्यामुळे चांगला रिकव्हरी असणारा ऊस आणि प्रामाणिक माणूस शोधायचे काम भविष्यात करावे लागणार आहे. कागदाला कागद जोडून जसा प्रस्ताव तयार होतो तसं माणसाला माणूस जोडून संघटना तयार होतो आणि संघटनेवर पक्ष चालतो आणि संविधानावर देत चालतो. याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

