Advertisement
भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे हब
सोलापूर : पुण्याच्या या हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज कोट्यावधीची उलाढाल होते. याचा थेट फायदा राज्याच्याच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. पुण्याच्या या हिंजवडी आयटी पार्कमध्ये जागा अपुरी पडत आहे.
पुण्यानंतर आता सोलापूर महाराष्ट्रातील दुसऱ्या आणि भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे IT पार्क उभारले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. बहुप्रतिक्षित सोलापूर-मुंबई आणि सोलापूर-बंगळुरू विमानसेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात IT पार्क उभारण्याची घोषणा केली. सोलापूरला लवकरच एक चांगला आयटी पार्क तयार करणार आहोत. सोलापूरची जी मुले पुण्यात बसली आहे,त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन देणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.दरम्यान. यापूर्वीच सोलापूरला IT पार्क उभारण्याच्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे. आयटी पार्कसाठी सुयोग्य जागा शोधण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना जागेचा शोध घेऊन प्रस्ताव देण्याचे आदेश दिले आहेत. कुंभारी औद्योगिक वसाहती प्रस्ताव देण्यात आला. शहरापासून 8 ते 10 किमी अंतरावर असलेल्या कुंभारी औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. वसाहतीसाठी 964 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी 24 कोटींची मागणी करण्यात आली होती. पण हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित राहिला. आता पुन्हा नव्याने हा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. कुंभारी MIDC सह सोलापूर ते पुणे व सोलापूर ते विजयपूर या महामार्गांच्या जवळ असलेल्या शासकीय व खासगी जमिनींचा शोध घेण्यात येणार आहे.
