#

Advertisement

Thursday, November 13, 2025, November 13, 2025 WIB
Last Updated 2025-11-13T12:10:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

इंदुरीकर महाराज यांनी कीर्तन सोडण्याचा घेतला निर्णय ?

Advertisement

संगमनेर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं. लेकीच्या साखरपुड्यामधील कपड्यांवर झालेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज यांनी व्यथित होऊन कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात, आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी भेट होत नसे. मी लोकांसाठी धावत राहिलो. पण, आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगावरच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत. यापेक्षा वाईट काय असेल? चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या साखरपुड्याचे कपडे चर्चेत आहेत. पण, तिच्या बापाला काहीही विचारत नाहीत. ते म्हणाले, तुमच्याही मुली असतील. तिच्या कपड्यांवर कोणी बोललं तर तुम्हाला काय वाटेल? साखरपुड्यात कपडे मुलीकडून घेतले की नवरदेवाकडून? मग त्यावर माझा काय दोष? एवढी तरी लाज असावी ना! 31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना प्रेरणा दिली, उपदेश केला पण आता मजा उरली नाही. लोकांच्या शिव्या खात खात आयुष्य गेलं पण आता हे व्यक्तिगत पातळीवर गेलं आहे. मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला पण कुटुंबावर बोट गेलं की सहन होत नाही.  त्यांनी असंही स्पष्ट सांगितलं की, ते काही दिवसांत एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध करून कीर्तन थांबवण्याचा औपचारिक निर्णय जाहीर करतील.