#

Advertisement

Wednesday, November 26, 2025, November 26, 2025 WIB
Last Updated 2025-11-26T17:12:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : "या" ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती

Advertisement

मुंबई : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान त्यानंतर लगेचच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे, दरम्यान,  निवडणूक आयोगानं या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे, काही जागांवरच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाकडून मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा, तसेच धुळ्याच्या पिंपळनेरमधील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन आणि  बीड जिल्ह्यातल्या गेवराई नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 येथील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.  मनमाड नगपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दहाची निवडणूक निवडणूक आयोगाकडून स्थगित करण्यात आली आहे,  प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानं ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे, तर दुसरीकडे धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक दोन ची देखील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  बीड येथील गेवराई नगरपरिषद येथील प्रभाग 11 चे उमेदवार श्रीमती दुरदाना बेगम सलीम फारुकी यांचही निधन झाल्यानं या  प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मतदानाला आता अवघे पाच दिवस शिल्लक आहेत, या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू असून, बड्या नेत्यांच्या आपल्या पक्षातील उमेदवारांसाठी सभा होत आहेत.