Advertisement
सोलापूर : महापालिकेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा सोमवारी (दि. 17 नोव्हेंबर) आरक्षण निश्चित व सोडत निघणार आहे. महापालिकेतील काही जागांवरील आरक्षणात पुन्हा बदल होण्याची शक्यता असल्याने काहींना त्याचा राजकीय फटका बसणार आहे. महापालिका निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट होणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगामार्फत 14 नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार नवी मुंबई, उल्हासनगर, पनवेल, मालेगाव, जळगाव, सोलापूर, इचलकरंजी आणि जालना या महापालिकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला या प्रवर्गांकरिता पुनश्च आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोलापूर महापालिका क्षेत्रातील प्रवर्गांसाठीची आरक्षण सोडत दि.17 नोव्हेंबर रोजी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे सकाळी 10:30 वाजता पार पडणार आहे. या आरक्षण सोडतीस संबंधित जनप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
