#

Advertisement

Sunday, November 16, 2025, November 16, 2025 WIB
Last Updated 2025-11-16T14:13:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रातील विद्येचे दुसरे माहेरघर नवी मुंबईत

Advertisement

पुणे : पुणे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. आता महाराष्ट्रातील दुसरे विद्येचे दुसरे माहेरघर नवी मुंबईत सुरु होणार आहे. नवी मुंबई जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. 14 जून 2025 रोजी सिडको, महाराष्ट्र शासन आणि यॉर्क विद्यापीठ, ॲबरडीन विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉइस इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयईडी विद्यापीठ या पाच नामांकित परदेशी विद्यापीठांदरम्यान सामंजस्य करारनामा करण्यात येऊन नवी मुंबईमध्ये कॅम्पस स्थापन करण्याकरिता या विद्यापीठांना इरादापत्रे प्रदान करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोच्या एज्युसिटी उपक्रमांतर्गत नवी मुंबईमध्ये पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ येथे उत्कृष्टता केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स) अंतर्गत अंदाजे 100 हेक्टर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय एज्युसिटी प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. एकात्मिक आरोग्यविषयक व शैक्षणिक सुविधा, आंतरराष्ट्रीय मानकांचे क्रीडा संकुल व कौशल्य केंद्र उभारण्याच्या प्रमुख उद्देशाने उत्कृष्टता केंद्र हा प्रकल्प सिडकोतर्फे विकसित करण्यात येत आहे. 

या प्रकल्पाकरिता जमीन विकसित करण्याच्या कामाला गती देण्यात आली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. “आंतरराष्ट्रीय एज्युसिटी हा देशामध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारा प्रकल्प असून याद्वारे देशातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी विद्यापीठे आणि नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या केंद्रामुळे बहुसांस्कृतिक आदानप्रदान आणि संशोधन यांना चालना मिळणार आहे.आंतरराष्ट्रीय एज्युसिटी एक ऐतिहासिक उपक्रम असून ज्यामध्ये एकाच ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये 10 हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठे सामील असतील. हा देशातील अशा प्रकारचा एकमेव उपक्रम ठरेल.

ही एज्युसिटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 3 ते 4 किमीच्या परिघात वसलेली आहे. या व्यतिरिक्त मल्टिमोडल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग यांद्वारे देखील कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. मुंबईहून वाहनाद्वारे एज्युसिटी एक तासाच्या अंतरावर असून एरोसिटी, नैना शहर, खारघर कार्पोरेट पार्क, गोल्फ कोर्स व पनवेल महानगरपालिका क्षेत्रापासूनही नजीकच्या अंतरावर आहे.