Advertisement
अंजली दमानियांनी यादीच वाचली
मुंबई : पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण खुलासा केल्यामुळे झी 24 तास या वृत्तवाहिनीचं कौतुक केलं. यानंतर अंजली दमानिया यांनी झी 24 तासच्या 'To The Points' नावाच्या स्पेशल शोमध्ये अजित पवार यांच्या 2016 मध्ये 69 कंपन्या होत्या. सिंचन घोटाळा, शिखर बँकेचा घोटाळा, जरांडेश्वर घोटाळा माफ झाला, ईडीने जप्त केलेल्या गोष्टी परत मिळाल्या. अजित पवारांच्या या घोटाळ्यांची यादी पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते, अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.
अंजली दमानिया यांनी To The Points या मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, अजित पवार यांच्या कंपन्यामध्ये फक्त आणि फक्त जमिनीचे व्यवहार झाले आहेत. ज्यामध्ये तळेगाव, मुळशी, बारामती अशी यादीच तयार आहेत. या सगळ्या जमिनी कशा घेतल्या? काय घेतल्या? या सगळ्याची मी एक यादी तयार करुन याचिका करेन किंवा सरकारला सांगेन पण सरकारला सांगूनही काही फायदा नाही. कॉन कन्वेश्नल पीआयएल करायचं आहे. कारण आम्ही जिवाची पर्वा न करता स्वतःचा पैसा खर्च करुन आम्ही लढतो. पण त्यामधून काय घडतंय. कारण चौकशी रद्द करण्याचा आदेश कुणी दिला. Sujay Agro, Sutara Agro, Sap यासारख्या कंपन्या आहेत ज्या अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर आहेत. तसेच RAJ नावाच्या असंख्य कंपन्या आहेत. त्यामध्ये अजित पवारांसह दोन नावांच्या व्यक्तींचा समावेश असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनीला आहे. 2009 साली एका धरणाला लागून जमिन होती ज्याची प्रायव्हेट फार्म हाऊस आणि धरण अशी त्याकाळी त्याची चर्चा होती. पण या धरणांबाबत किंवा तेथील जमिनींबाबत कोणतीही कारवाई झाली नाही, असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.
