Advertisement
अजित पवारांनी स्टार प्रचारक यादीतूनही डावलल्याने रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आलेलं नाही. याआधी अजित पवारांनी त्यांची प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी केली होती. प्रवक्तेपदानंतर आता स्टार प्रचारकांच्या यादीतही स्थान देण्यात आलं नसल्याने रुपाली ठोंबरे पाटील यांचा संताप झाला आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आता आपल्या रोखठोक स्वभावाला जागत सगळेच राजकीय पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. मी पुणे मनपाची निवडणूक लढणार असल्याने कदाचित या यादीत माझं नाव नसेल असं सांगतानाच आपल्याला इतर राजकीय पक्षांच्याही खुल्या ऑफर असल्याचं त्यांनी जाहीर करून टाकलं आहे.
माझ्याकडे जो खुलासा मागितला होता, त्याला मी कायदेशीर उत्तर दिलं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि प्रदेशाध्यक्षा यांच्यासंदर्भात मी नेमकं कोणतं विधान केलं आहे याचा उल्लेख त्यांनी केलेला नाही. राज्य महिला आयोग हे संवैधानिक पद असून, त्याचा पक्षाशी संबंध नाही. प्रदेशाध्यक्षांबद्दल तर मी काहीच म्हटलेलं नाही. त्यामुळे संपदा मुंडेंबाबत यांच्यासंदर्भात माझी जी भूमिका होती, त्यात चारित्र्यहनन झाल्याने महाराष्ट्राने केलेली मागणी मी सांगितली, असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितलं आहे.
ठोंबरे पुढे म्हटलं की, सुनील तटकरे यांनी प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली असून, त्यात माझ्यासह माझ्यासह अमोल मिटकरी यांनाही वगळण्यात आलं आहे. त्यासंदर्भात मी अजित पवारांसंदर्भात चर्चा होणार आहे. स्टार प्रचारक यादीबद्दल बोलायचं गेल्यास मी स्वत: पुणे मनपा लढणार आहे. माझ्यावर कसबा मतदारसंघाची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे ही पक्षाची प्रक्रिया असते. त्यामुळे जे निवडणूक लढणार नाहीत, पक्षात आहेत त्यांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारक यादीत नसले तरी मीच निवडणूक लढणार असल्याने मी कुठे बाहेर जाऊच शकणार नाही.
