Advertisement
ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी घेतली शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत सर्वेसर्वा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतीच घोषणा केली होती. प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार केला. त्यानुसार पक्ष विस्तारासाठी राज्यभर सक्रियपणे ते काम करीत आहेत. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून खडसे काम पाहत असल्या तरी महिला उपप्रदेशाध्यक्षा पदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. त्यानुसार शरद पवार यांच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील युवा नेतृत्त्व म्हणून ओळख असलेल्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या असलेल्या ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या नियुक्तीनंतर सोलापूर जिल्ह्यासह अवघ्या राज्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी याचे स्वागत केले आहे. यापार्श्वभूमीवर आज ऍड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट घेत चर्चा केली तसेच आगामी काळात महिलांकरीता राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रम, उपक्रमांविषयी माहिती दिली.
