#

Advertisement

Saturday, November 22, 2025, November 22, 2025 WIB
Last Updated 2025-11-22T12:26:28Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांच्या घराजवळ जादूटोणा ?

Advertisement

लिंबू, मिरच्या, हळद कुंकू, नारळाचा उतारा 

बारामती : शहरातील सहयोग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार राहतात. या सहयोग सोसायटी समोरून बारामती शहरातील एक महत्त्वाचा रस्ता जातो. या रस्त्याच्या बाजूला फुटपाथ  आहे. या फुटपाथवर लिंबू नारळ आढळून आले. हा आघोरा प्रकार आज सकाळी काही नागरिकांना पाहायला मिळाला. सजग नागरिकांनी ते बाजूला काढून टाकले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावरच हा प्रकार समोर आला आहे. आता, हा जादूटोणा आहे का? की अन्य काही अशी चर्चा बारामतीत रंगली आहे.  शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आणि विचाराने प्रगल्भ असणाऱ्या बारामतीत असे प्रकार घडणे हे धक्कादायक समजलं जातं आहे.
बारामती शहरातील फुटपाथवर सकाळी व्यायामासाठी गेलेल्या नागरिकांना हळद-कुंकू टाकलेले काही लिंबू नारळ यासोबत इतर काही गोष्टी आढळून आल्या. त्यामुळे कोणीतरी या ठिकाणी जादूटोण्यासारखा अघोरी प्रकार केला की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.  
बारामती पोलिसांकडे या संपूर्ण प्रकरणाबाबत कोणतेही माहिती उपलब्ध नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ अशाप्रकारे लिंबू, नारळ ठेवले जाणे हे सामान्य माणसाचं काम नाही. कोणी सामान्य माणूस हे धाडस करू शकत नाही. हा नक्कीच कोणाच्यातरी अंधश्रद्धेचा भाग असावा किंवा दृष्ट टाकण्याच्या हेतूने केलेला प्रकार असावा. तर काही जण असा अंदाज लावत आहेत की हे जादूटोण्याचा स्वरूप नसून कोणीतरी विनाकारण टाकलेले पदार्थ असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासावेत अशी मागणी होत आहे.