Advertisement
बारामती : माळेगाव नगरपंचायतीच्या पंचवर्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलता अजित पवार यांनी स्थानिकांना थेट धमकीच दिल्याचं पाहायला मिळालं आहे. अजित पवारांनी आपल्याच उमेदवारांना निवडून आणावं असं आवाहन करताना असं झालं तर निधीमध्ये कपात होईल असं म्हटलं आहे.
तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामे करुन देईल. तुम्ही काट मारली तर मी पण निधीत काट मारणार, असं वक्तव्य अजित पवारांनी बारामतीत केलं आहे. माळेगावमध्ये बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेले सगळं करणार. तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार," असे म्हणत अजित पवारांनी थेट मतदारांनी धमकीच दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ शुक्रवारी माळेगावमधून फोडला. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले की, निर्धारस्त रहा डोळे झाकून माझ्या पाठीशी उभे रहा आणि उभा केलेल्या 18 नगरसेवकांना मतदान करा. उद्या जर दुसरे निवडून आले आणि त्यांना वरून निधी नाही मिळाला तर ते काय करणार आहेत? अरे आम्हाला निधीच नाही मग कोणी सांगितलं होतं उभा राहायला? असा सवाल अजित पवारांनी केला. तसेच, माळेगाव नगरपंचायत माझ्या विचाराचे नसेल तर माझं काहीच अडत नाही. माझं माझं चालला आहे पण मी दिलेला निधी आमच्या विचारांचे लोक असतील तर मला त्यांना सांगता येईल की इथे असं झालं पाहिजे तिथे तसं झालं पाहिजे. माळेगाव ग्रामपंचायत असतानाही इथल्या कामाला आपण प्रधान देण्याचा प्रयत्न केला मी अनेक दिवस निधी देत आलो आहे, असंही उपमुख्यमंत्री म्हणाले.
