#

Advertisement

Thursday, November 27, 2025, November 27, 2025 WIB
Last Updated 2025-11-27T12:33:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूर उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे १४ डिसेंबरला ‘मेगाब्लॉक’

Advertisement

सोलापूर : सोलापूर रेल्वेस्थानक परिसरातील जुन्या उड्डाणपुलाचे (ROB) पाडकाम हाती घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात १४ डिसेंबर २०२५, रविवारी तब्बल साडेबारा तासांचा (१२:३० तास) मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या कामामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या ११ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून, ८ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
१४ डिसेंबर (रविवार) रोजी मध्य रेल्वे सोलापूर यार्डातून धावणाऱ्या ११ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये महत्त्वाची पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस (12025) देखील रद्द राहील. मेगाब्लॉकमुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ८ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तसेच, काही पॅसेंजर गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकापूर्वीच थांबवण्यात येणार आहेत. म्हैसूर-पंढरपूर एक्सप्रेस (16535/16536), टीव्हीसी-सीएसएमटी एक्सप्रेस (16332), एसबीसी-सीएसएमटी एक्सप्रेस (11302/11301) या गाड्या सोलापूरकडे न जाता वळवण्यात आलेल्या मार्गाने धावतील. तर, पुणे-सोलापूर एक्सप्रेस (12169) कुर्डुवाडी (KWV) पर्यंतच धावेल, तर सोलापूर-हासन एक्सप्रेस (11311) कलबुरगी (KLBG) येथून सुरू होईल.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, १४ डिसेंबरला प्रवास करण्यापूर्वी त्यांच्या गाडीची स्थिती निश्चितपणे तपासून घ्यावी. तसेच, ब्लॉक संपल्यानंतर ट्रॅक सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावर पहिली गाडी फक्त १० KMPH च्या वेगाने चालवली जाईल. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.