Advertisement
मंगळवेढा येथे स्वरपुष्पांजली हा सुश्राव्य भजन आणि पुष्प अर्पण कार्यक्रम
मंगळवेढा : शाहू परिवाराची माऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. साै. अनुराधाताई लक्ष्मण ढोबळे यांची जयंती शनिवारी (दि. २९ नोव्हेंबर २०२५) साजरी होत आहे. यानिमित्त मंगळवेढा येथील सावली निवास येथे सकाळी ११ : ०० वाजता स्वरपुष्पांजली हा सुश्राव्य भजन आणि पुष्प अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे, असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपप्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलतायेई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.
मोहोळचे माजी आमदार तथा राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या राजकीय वाटचालीत मोलाची साथ त्यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांनी दिली. याचा साक्षीदार संपूर्ण शाहू परिवार आहे. सावली वूमेन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष म्हणून अनुराधा ढोबळे यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. अनुराधा ढोबळे यांनी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांवरील सांसारिक तणाव कमी करावा यासाठी विविध उपक्रम राबविले. तसेच, त्यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले. महिलांना बचतीची सवय लागावी म्हणून १० हजार महिलांना त्यांनी पोस्टाची बचत खाते काढून दिले. तसेच, शाहू शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी जीवनाच्या अखेर पर्यंत भूमिका स्विकारली होती. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठीही त्यांचे मोठे योगदान दिले आहे. त्यांचा हा वारसा त्यांच्या कन्या ऍड. कोमलतायेई साळुंखे-ढोबळे यांनी सुरू ठेवला आहे. दरम्यान, जयंती निमित्त ओयोजित कार्यक्रमास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
