Advertisement
पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे इथं 16 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता, "प्लेसमेंट ड्राइव्ह"चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे शहर परिसरातील बी.ए.सी.एस एनर्जी प्रा.लि. कल्याणी नगर, पुणे, एच.डि.एफ.सी लाईफ इन्शोरन्स हडपसर, पुणे, एफ.एफ सर्व्हिसेस प्रा.लि. अतुर हाऊस, कॅम्प, पुणे, सिध्दी सिक्युरिटी सर्व्हिसेस जुनी सांगवी पुणे व टि.के.आय.एल इंडस्ट्रिज प्रा.लि. पुणे या उद्योजकांनी सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभाग दर्शविलेला आहे.
या कंपन्यांकडून 300 पेक्षा जास्त रिक्तपदे भरली जाणार आहे. त्याबाबती माहिती त्यांनी दिली आहे. ही सर्व रिक्तपदे किमान 10वी,12 वी, पदवीधर, आयटीआय,पदविका या शैक्षणिक पात्रतेची आहेत. त्यात ट्रेनी,टेक्निशियन,स्टोअर हेल्पर ,स्टोअर असिटंट, बिझनेस डेव्हलोपमेंट मॅनेजर, फायनॅन्शल कन्सल्टंट, टिंग वेल्डर, पाइप फिटर, एचआर, हाऊसर्किपीग, सिक्युरिटी गार्ड, फिटर, गॅस वेल्डर अशा विविध पदांसाठी ही प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे. पात्रताधारक उमेदवारांसाठी या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांना ऑनलाइन अॅप्लाय करणे आवश्यक आहे. नोकरीइच्छूक उमेदवारांनी विहीत दिनांकास प्लेसमेंट ड्राइव्हच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार बायोडाटा अर्जाच्या (Resume) प्रती सोबत आणणे बंधनकारक आहे.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पुणे येथे कार्यालयीन वेळेमध्ये प्रत्यक्ष अथवा 020 26133606 या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सु. रा. वराडे यांनी केले आहे.
