Advertisement
तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बुथवर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील एका बुथवर घडली घटना मतदान करण्यासाठी आलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. राजश्री सदाशिव भोसले ही मतदान करण्यासाठी आली असता तिला चक्कर आली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राजश्री सदाशिव भोसले या महिलेला चक्कर आल्यानंतर बूथ वरील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
