#

Advertisement

Monday, December 8, 2025, December 08, 2025 WIB
Last Updated 2025-12-08T18:14:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मानवी पांडुरंगाला मानासन्मानाचा अखेरचा नमस्कार : डॉ. प्रा. लक्ष्मणराव डोबळे

Advertisement

सोलापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे पुणे येथे निधन झाले. वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.डॉ. बाबा आढाव हे केवळ एक ज्येष्ठ समाजसेवक नव्हते तर सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी आणि कष्टकऱ्यांचे नेते होते. त्यांनी असंघटित आणि वंचित कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर काम केले.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी मंत्री डॉ. प्रा. लक्ष्मणराव डोबळे म्हणाले की, आदरणीय डॉ. बाबा आढाव यांचे देहवसान झाले. मनाला वेदना झाल्या. आज, सामाजिक परिवर्तनाची दिशा निश्चीत करणारा दिपस्तंभ, सर्व मानवजातीच्या कल्याणाचा रक्षककर्ता, सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ म्हणून जोशाबाचा विचारांचा पायीक हरपला आहे. सामाजिक चळवळीमध्ये काम करणाताना वृतस्थ जीवन जगताना उपेक्षित मानवजातीच्या कल्याणासाठीचा विचार सतत मांडणाऱ्या डॉ. बाबांनी आयुष्यभर हमाल पंचायत, कष्टकरी माणसाच्या पाठीवरच ओझ, कष्टाची भाकरी, शाहू फुले आंबेडकर जोशाबाचा विचार अखेरच्या श्वासापर्यंत मांडला. माणुसकीचा गहिवर सामाजिक परिवर्तनाच्या मोक्ष साधनेच्या वाटेवर मानवी मुल्यांची जपणूक करणारे मंदिरच मराठी मुलखाला पारखे झाले, अशा वेदनामय सद्‌गतीत झालेल्या माणुसकीला वंदन करतो आणि डॉ. बाबा आढावांच्या चरणी प्रार्थना करतो. आम्हा सगळ्यांचा आयडॉल हरपला. मुल्य जोपसणारा रक्षणकर्ता आज आमच्यापासून परमेश्वराने हेरावून घेतला आहे, अशा मानवी पांडुरंगाला मानासन्मानाचा अखेरचा नमस्कार.