Advertisement
बीड : पालवणजवळ अभिनेते सयाजी शिंदेंनी उभारलेल्या देवराईला आग लागली आहे. देवराईला अचानक आग लागल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. एकाएकी इतक्या झाडांना आग कशी लागली? असा प्रश्न विचारला जात आहे. जगातील पहिले वृक्ष संमेलन बीडच्या सह्याद्री देवराई येथे झाले होते. या आगीत अचानक हजारो झाडांना आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
'सह्याद्री देवराई' नावाची संस्था अभिनेते सयाजी शिंदे यांनी पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षसंवर्धनासाठी स्थापन केली आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी देवराया विकसित केल्या आहेत, ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील पालवन येथील देवराई अत्यंत प्रसिद्ध आहे.
सह्याद्री देवराई आणि संबंधित आग लागण्याच्या घटनांची माहिती समोर आली आहे. देशी वृक्षांची लागवड, संवर्धन आणि जैवविविधतेचे रक्षण करणे. सयाजी शिंदे यांनी आतापर्यंत राज्याच्या विविध भागात 10 लाखांहून अधिक झाडे लावली असून अनेक ठिकाणी देवरायांची निर्मिती केली आहे बीडमधील देवराईत जगातील पहिले 'वृक्ष संमेलन' आयोजित करण्यात आले होते. ही देवराई आता एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखली जाते.
