#

Advertisement

Saturday, December 13, 2025, December 13, 2025 WIB
Last Updated 2025-12-13T15:11:45Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबईत महायुतीमध्ये खोडा पडण्याची शक्यता

Advertisement

भाजपचा नवाम मलिकांना विरोध तर अजित पवारांकडून पाठराखण करत

मुंबई : महापालिका निवडणुकांमध्ये महायुती म्हणून लढण्यावर तिनही पक्षांच्या प्रमुखांचं एकमत झाल आहे. मात्र, मुंबईत भाजपचा नवाम मलिकांना विरोध आहे. नवाब मलिक राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार असतील तर राष्ट्रवादी सोबत जाणार नाही यावर भाजप नेते ठाम आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी मलिकांची पाठराखण करत मलिकच मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार असल्याचं एकप्रकारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईत महायुतीमध्ये खोडा पडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचा दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेशी संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे भाजपचा नवाब मलिकांना कडाडून विरोध आहे. मात्र, असं असलं तरी राष्ट्रवादीचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारीक चर्चेदरम्यान नवाब मलिकांची पाठराखण केली आहे. मुंबई पालिका निवडणुकीबाबत नवाब मलिक यांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका असेल असं अजित पवारांनी  स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांनी मलिकांची पाठराखण केल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता आमची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. दररोज भूमिका मांडण्याची गरज नसल्याचे म्हटल आहे. त्यामुळे भाजपचा नवाब मलिकांना विरोध कायम असल्याचे स्पष्ट झाल आहे. तर जिथे नबाव मलिक आहेत तिथे आम्ही युती करणार नाही, असे म्हणत भाजपच्या प्रवक्त्यांनी पुन्हा एकदा नवाब मलिकांना विरोध केला आहे. जोपर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांच्यासोबत जाणार नसल्याची भूमिका भाजपचे माध्यमप्रमुख बन यांनी मांडली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत तरी महायुती बिनसणार असल्याची चिन्ह आहेत.