#

Advertisement

Tuesday, December 2, 2025, December 02, 2025 WIB
Last Updated 2025-12-02T13:12:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचं पारडं जड?

Advertisement

मात्तबर नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला 

मुंबई : राज्यामध्ये नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील कोण कोणत्या नेत्यांचा कस लागला आहे. 
सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेत भाजप वि. शिवसेना शिंदे गट अशी लढत असणार आहे. याठिकाणी भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री शिंदे सेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे या नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. अकलूज नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर पंढरपूर नगरपालिकेत माजी आमदार प्रशांत परिचारक याची प्रतिष्ठा पणाला येथे काही भागात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. लक्ष्मणराव ढोबळे यांचेही मोठे राजकीय वजन असल्याने त्यांचेही कसोटी लागणार आहे. सांगोला नगरपालिका माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, आजरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्याच बरोबर भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची मुरगूड, गडहिंग्लज, चंदगड, शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि हुपरी नगरपंचायत निमित्ताने कस लागला आहे.  पन्हाळा, पेठ वडगाव, मलकापूर नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.