Advertisement
मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेतील नेत्यांच्या 6, भाजप 4, राष्ट्रवादी 3 तर काँग्रेस 2 नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस, मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या पहिल्या यादीत घराणेशाहीचा बोलबाला दिसून आला आहे. |मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत एकूण 28 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात 6 उमेदवार घराणेशाहीतून आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पहिल्या यादीत माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमध्ये आमदार अस्लम शेख यांच्या कुटुंबात दोघांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ आणि वहिनीला उमेदवारी मिळाली आहे.
मुंबई महापालिकेत घराणेशाहीचा बोलबाला
शिवसेना ठाकरे गट : प्रभाग क्र. 54 - अंकित प्रभू, आमदार सुनील प्रमुख यांचा मुलगाप्रभाग क्र. 64 - सबा हारुन खान, आमदार हारुन खान यांची मुलगीप्रभाग क्र. 89 - गितेश राऊत, माजी खासदार विनायक राऊतांचा मुलगाप्रभाग क्र. 150 - सुप्रदा फातर्फेकर, माजी आमदार प्रकाश फातर्फेकर यांची मुलगीप्रभाग क्र. 225 - अजिंक्य धात्रक, माजी आमदार अशोक धात्रक यांचा मुलगाप्रभाग क्र. 95 - हरी शास्त्री, माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई
राष्ट्रवादी अजित पवार गट : प्रभाग क्र. 165 - कप्तान मलिक, नवाब मलिक यांचे बंधूप्रभाग क्र. 168 - डॉक्टर सईदा खान, नवाब मलिक यांची बहीणप्रभाग क्र. 170 - बुशरा नदीम मलिक, नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांची सून
काँग्रेस : प्रभाग क्र. 33 - कमरजा सिद्दिकी, आमदार अस्लम शेख यांची बहीणप्रभाग क्र. 34 - हैदर अली शेख, आमदार अस्लम शेख यांचा मुलगा
भाजप : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर यांना तिकीट देण्यात आलंयमाजी आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित यांना उमेदवारी दिलीयतर माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना पुन्हा तिकीट मिळाले आहे.
