Advertisement
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा मुद्दा ऐरणीवर असताना. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या निवडणूक आयोगाने या विषयावर कठोर पाऊल उचलत ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे, अशा सर्व जिल्हा परिषदामध्ये आरक्षण सोडत पुन्हा एकदा काढली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण मर्यादा ओलांडली जाऊ नये यासाठी ही नवी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या प्रक्रियेत, जिथे आरक्षण जास्त झाले आहे, तिथे पुन्हा महिला आणि ओबीसी (OBC) महिला आरक्षणासाठी सोडत काढण्याची शक्यता आहे. ही नव्याने आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणपणे 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी
डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून वेगाने हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आयोगाने ही नवी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
