Advertisement
महापालिका निवडणुकीत मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता
पुणे : महापालिका निवडणुकीआधीच शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केले. जगताप यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटलं आहे. मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शरद पवारांसमोर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांच्या हाकेला प्रतिसाद देत करोडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले, त्यात मीदेखील होतो याचा अभिमान आहे. शरद पवारांवर नितांत प्रेम, श्रद्धा, विश्वास कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. 26 वर्ष 6 महिने 14 दिवस मला शरद पवारांच्या पक्षात राहता आलं, वेगवेगळ्या कामाची संधी मिळाली हा माझ्या आयुष्याचा खूप मोठा ठेवा समजतो. पवार साहेबांच्या आशीर्वादीने या शहराचं कामकाज सांभाळणारे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मधील काळात लाडक्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात कामकाज करण्याची संधी मिळाली याबद्दल त्यांचेही आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरचिटणीस पदापासून ते अध्यक्षपर्यंत मिळालेली पदं, पीएमटी सदस्यापासून नगरसेवक, महापौर ही मिळालेली पदं शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यामुळे मिळाली. सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला पदं मिळाली. पक्षात चांगलं कामकाज केलं याची नोंद घेऊन संधी दिली त्याबद्दल ऋणी राहील, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.
