#

Advertisement

Wednesday, December 24, 2025, December 24, 2025 WIB
Last Updated 2025-12-24T17:43:31Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अभिजीत बिचुकलेचा पराभवही ठरला खास

Advertisement

सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिळाली चौथ्या क्रमांकाची मतं 

सातारा : अभिजीत बिचुकले यांनी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा नशिब अजमावून पाहीले. सातारा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. या निवडणुकीत त्यांचा नेहमी प्रमाणे पराभव झाला. पण त्यांनी चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली. शिवाय आधी त्यांनी मिळालेल्या मतांचे रेकॉर्डी त्यांनी तोडले. त्यामुळे हा पराभव ही त्यांच्यासाठी खास म्हणावा लागेल.
सातारा नगराध्यक्षपदासाठी एकूण 9 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यात भाजपच्या अमोल मोहिते यांनी बाजी मारली. त्यांना 57 हजार 587 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुवर्णादेवी पाटील राहील्या. त्यांना 15 हजार 555 मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार  शरद काटकर राहीले. त्यांना 3 हजार 900 मतं मिळाली. तर चौथ्या क्रमांकावर अभिजित बिचुकले राहीले त्यांना जवळपास 2 हजार 772 मतं मिळाली. एकूण सहा अपक्ष उमेदवार हे मैदानात होते. त्यात बिचुकले यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. चार अपक्ष उमेदवारांना त्यांच्या पेक्षा कमी मतं मिळाली.
या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना किती मतं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत बिचुकलेंनी अनपेक्षित कामगिरी केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांनी चौथा क्रमांकाची मतं मिळवली आहेत. अपक्ष उमेदवारांच्या यादीत तर त्यांनी 2,773 मते मिळवून दुसरे स्थान मिळवले आहे. याआधी त्यांनी बारामती मतदारसंघातून नशीब आजमावले होते. मात्र तिथे त्यांना केवळ 68 मतांवर समाधान मानावे लागले होते. तसेच सातारा-जावळी मतदारसंघात त्यांना 529 मते मिळाली होती. वरळीतूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तिथे ही त्यांचा टीकाव लागला नव्हता.