Advertisement
पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी अवघे काही तास उरलेले असताना आणि प्रचारावर बंदी असतानाही मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवले जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात निवडणुकीच्या काळात मतदारांना वॉशिंग मशीन तसेच चांदीची भांडी वाटली जात असल्याची माहिती समोर आली आहे. जप्त मालाची एकूण किंमत : 1 लाख 29 हजार 200 रुपये पेक्षा अधिक आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने कारवाई करत तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. रहाटणी परिसरातील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीनच वाटप केले जात असल्याची तक्रार मिळाली होती. या तक्रारीच्या आधारे निवडणूक प्रशासनाचे भरारी पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि 19 वॉशिंग मशीन जप्त केल्या. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. निवडणूक प्रशासनाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत AKIVA कंपनीच्या 19 नव्या वॉशिंग मशीन जप्त करण्यात आल्या आहेत. रहाटणी परिसरात मतदारांना वॉशिंग मशीनचं वाटप केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापेमारी केली. तपासादरम्यान एक वाहन संशयास्पदरीत्या आढळून आले. या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये AKIVA कंपनीच्या 19 नव्या वॉशिंग मशीन आढळून आल्या.
