#

Advertisement

Wednesday, January 14, 2026, January 14, 2026 WIB
Last Updated 2026-01-14T13:20:17Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबईत गेम चेंजर ठरणार ठाकरेंचे 2 हजार 'भगवा गार्ड

Advertisement

 महापालिका निकाल फिरवण्याची ताकद असलेली टीम  

मुंबई :  मतचोरी, दुबार मतदार, बोगस मतदान हे गैरप्रकार टाळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे अनुक्रमे उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे पक्ष सज्ज झाले आहेत. या दोन्ही पक्षांकडून मतदानाच्या दिवशी, 15 जानेवारीला मतदान केंद्रांबाहेर ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात येणार आहेत. अशा दोन हजार गार्डची या गैरप्रकारांवर करडी नजर असेल. मुंबईत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याने यापैकी काही टक्के मतदार जरी या भगवा गार्डच्या माध्यमातून पकडण्यात आले तरी त्याचा मतदानावर मोठा परिणाम होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच ही टीम निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंसाठी गेम चेंजर ठरु शकते अशी चर्चा आहे.
ठाकरे बंधूंनी त्या वेळी दुबार आणि बोगस मतदारांना फटकावले जाईल, असा इशारा दिला होता. शिवाजी पार्कवर झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे यांनी याविरोधात सज्ज राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भगवा गार्डची जबाबदारी देण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे सत्र गेल्या दोन दिवसांपासून सुरू असून, त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.
 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची भगवा गार्ड हे विषेश पथक तैनात असेल. या अंतर्गत प्रत्येक मतदान केंद्राजवळ आणि आसपासच्या परिसरात भगवा गार्ड कार्यरत असतील. निवडणूक आयोगाने जाहीर केलेली दुबार मतदारांच्या नावाची यादी या गार्डकडे देण्यात आली आहे. त्यानुसार मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदाराचा आढावा घेण्याचे काम या गार्डकडून करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या गार्डला भगव्या रंगाचं टी-शर्ट दिलं जाणार असून पाठीवर आणि पुढील बाजूला 'मी मराठी... भगवा गार्ड' असं लिहिलेलं असेल. कोणालाही दुबार किंवा बनावट मतदान करणारी व्यक्ती आढळून आली तर या गार्डशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.