Advertisement
सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराने भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रचार रॅलीदरम्यान अजित पवार गटाचा उमेदवार भाजपात दाखल झाला आहे. प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार तुषार जक्का यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस मला प्रचाराला वेळ देत नाही, कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान भाजप आमचा उमेदवार पैसे देऊन पळवल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाने केला आहे. भाजपने 25 लाख रुपये देऊन आमचा उमेदवार पळवला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. सोलापूर महापालिकेच्या आठ प्रभागात राष्ट्रवादी आमने-सामने आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एकूण 54 उमेदवार तर शरद पवार पक्षाचे एकूण 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2017 साली महापालिकेत राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक होते. यावेळच्या निवडणुकीत मात्र दोन्ही राष्ट्रवादीने एकमेकांसमोर शड्डू ठोकला आहे.
दरम्यान, देवाला साक्षी ठेवून सांगतो पाणी दिले नाही तर माझ्या आमदारकीचा त्याग करेन अशी घोषणा भाजपा आमदाराने मुख्यमंत्र्यांसमोर केली आहे. सोलापूरला दररोज पाणीपुरवठा करू शकलो नाही तर आमदारकीचा त्याग करेन असं भाजपा आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोलापूर महापालिकेच्या प्रचारसभेत बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांनी हे विधान केलं आहे.
सोलापूर महापालिका 2017 चे पक्षीय बलाबल
एकूण 102 जागांपैकी भाजपला 49 जागा मिळाल्या होत्या.
शिवसेनेला 21
काँग्रेसला 11
एमआयएमला 09
राष्ट्रवादीला 04
बसपाला 04
तर माकपला 01 जागा मिळाली होती
