Advertisement
मुंबई : निवडणूक आयोगाने आज राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या माहितीनुसार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान असणार आहे. तर निकालाची तारी 7 फेब्रुवारी 2026 अशी असणार आहे. प्रत्येक मतदाराला दोन मतदान करावे लागतील. जिल्हा परिषद, पंचायत समिती निर्वाचक अशी दोन ठिकाणी मतदान करावे लागणार आहे. 25 हजार मतदान केंद्र असणार आहेत. राखीव मतदारावर जातवैधता पडताळणी पाहणे आवश्यक. जातवैधता सादर न केल्यास नामनिर्देशक रद्द केले जाईल.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, तर कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आहेत. दिनेश वाघमारे ,राज्य निवडणुक अयोग्य ,आयुक्त पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती असतील.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर, तर कोकण विभागातील रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आहेत.
या जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होणार
- कोकण- रायगड, रत्नागिरी सिंधुदु्र्ग
- पुणे - पुणे, साजारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
- छत्रपती संभाजी नगर - छ.संभाजी नगर, परभणी, लातूर
- अर्ज भरण्याचा कालावधी - 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026
- अर्जांची छाननी - 22 जानेवारी 2026
- अर्ज मागे घेण्याचा दिनांक- 27 जानेवारी 2026 (दुपारी ३3 पर्यंत)
- चिन्ह वाटप - 27 जानेवारी 2026
- मतदान दिनांक- 5 फेब्रुवारी 2026 सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत
- निकाल दिनांक- 7 फेब्रुवारी 2026 सकाळी 10 वाजता पासून
