#

Advertisement

Wednesday, January 21, 2026, January 21, 2026 WIB
Last Updated 2026-01-21T17:35:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे "घड्याळ" चिन्हावर लढणार

Advertisement

  • शरद पवार हे आमचे दैवत, अजित पवार सच्चे मार्गदर्शक 
  • लक्ष्मी दहिवाडी गटातून लढण्यास अन्य पक्षांकडूनही होता आग्रह 

सोलापूर : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लक्ष्मी दहिवडी गटातून राष्ट्रवादी काँगे्रसकडून माजी मंत्री डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत. शिवसेनेकडुनही त्यांना उमेदवारीची ऑफर आली होती, त्यांच्यासाठी एबी फॉर्मही पाठविण्यात आला होता, त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविण्याचा आग्रह शिवसेनेतील काही नेते मंडळींनी धरला होता, त्यावेळी शरद पवार हे आमचे दैवत आहे तर अजित पवार, सुप्रिया सुळे या आमच्या मार्गदर्शक असल्याचे अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आज सकाळी अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांना तुतारी आणि घड्याळ, असे दोन्ही एबी फॉर्म पक्षाने पाठविले होते. परंतु, कार्यकर्त्यांच्या आग्रहातून अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांनी अजित पवार यांनी पाठविलेला एबी फॉर्म अर्जाला जोडून घड्याळ चिन्ह स्विकारले, त्यामुळे लक्ष्मी दहिवडी पंचायत समिती गणातील उमेदवारांनीही राष्ट्रवादीचा (घड्याळ) एबी फॉर्म आपल्या आर्जाला जोडला. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करताना अ‍ॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांच्या समवेत माजी मंत्री डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, ऑल्मपिक असोसिएशनचे सदस्य अजय साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.